श्रेयस डायनिंग हॉल , आपटे रोड , पुणे
बऱ्याच दिवसांपासून पेंडिंग असलेला प्लॅन काल पूर्णत्वास आला.
निमित्त होता सौ च्या वाढदिवसाचं आणि त्यात चतुर्थी , आता चतुर्थी सोडायला हॊटेल कुठला शोधायचं?
म्हणून म्हटलं नाहीतरी कधीचं जायचंच आहे तर श्रेयस लाच जाऊया.
मग काय आम्ही वाकड हुन मजल दरमजल करत तब्बल तासाभरात पोहोचलो
मनांत विचार चालू होता आलो तर खरी …पण जेवणं कसं असेल माहित नाही (कारण Google Reviews )
आत शिरताच एक पोरगेलासा मुलगा गाडीसमोर आला आणि मला म्हणाला vallet पार्किंग आहे. मी त्याच्या हातात चावी दिली (पार्किंग चा संकट टळलं).मग आत प्रवेश केला ..लग्नाच्या पंगतीती असता तसंच काहीसं वातवरण होतं. वाढ्पींची लगबग ...तटावर बसलेल्यांची बडबड ...त्यात नुसतं उभे राहून कोणाला काय पाहिजे (किंबहुना कोण किती खाताय) हे बघणारे कर्मचाऱ्यांची गर्दी. एकाने आम्हाला आमचा टेबलं दाखवला (बहुतेक टेबल एकमेकांना जोडून होते त्यामुळे पंगतीत ली जागा दाखवली असे पण म्हणता येईल ) आम्ही बसताच एका पाठोपाठ एक वाढपी येणं सुरु झालं..
पहिलेच उकडीचा मोदक आणि साजूक तूप.
मेथीची पातळ भाजी
बटाट्याची सुकी भाजी (मिर्चीवरची)
मटकी उसळ
कटाची आमटी
कोशिंबीर(पचडी )
कढी
पिठलं (मी नाही घेतलं)
मसाला पुरी
साधी पुरी
ताक
इथपर्यंत सगळं घरगुती जेवण सारखं होतं
मग आले कॉस्मो महाराष्ट्रीयन मेनू
कटलेट
ढोकळा
ओली भेळ ??
टीप : वरील मेनू मध्ये बदल होऊ शकतो (असा तिथेच लिहिलं होतं)
वाढलेलं सगळं संपवून शेवटी भात आला (त्यात खिचडी आणि वरण भात ) असे ऑपशन्स होते
पण मोकळा भात पाहून खिचडी घेतली (वर साजूक तुपाची धार)
ताट रिकामं केल्यावर कोपऱ्यात ताकाची वाटी लपून बसली होती ...तेही गटकावलं.
एकूण जेवण समाधानकारक होतं ...अति तिखट किंवा आळणी असा काहीही नव्हतं.
फक्त जेवण होईपर्यंत एक काका दर ५ मिनीटांनी काय हवं विचारायला (किंवा किती वेळ आहे अजून हे बघायला ) यायचे. जेवण झाल्याची पोच पावती मिळताच टेबलं वर बिलाची पावती आली ...आणि त्याच्याबरोबर पानाचे विडे (उत्तम होते). तर अशा रीतीने योग्य ठिकाणी चतुर्थी सोडल्याच्या आनंदात परतीच्या प्रवासाला लागलो ...
टीप : श्रेयस ला भेट कुणी द्यावी ...ज्यांना बाहेर गेल्यावरहि घरची चव हवी आहे , अँबियन्स वगरे दुय्यम गोष्टी मानणारे , आणि पुण्याच्या खाद्यसंस्कृतीचा जाज्वल्य अभिमान असणाऱ्यांनी आवर्जून जावे.
इतरांनी एकदा भेट देण्यास हरकत नाही.
मराठी टायपिंग मध्ये चुका असल्यास क्षमस्व...जोश्यांचा मंदार
छान लिहिलंय, लिखाणाला पुणेरीपणाचा वास येतोय....
ReplyDeleteजमतंय लिहायला.......
Hahaha
Delete